हे स्वतः प्रत्यक्ष मोरयाचे व मुदगलांचे पूर्णावतार होते. २२८ वर्ष इतके दीर्घ आयुष्य त्यांना लाभले होते. त्यांनी संपूर्ण गणेश मार्गाचा प्रसार केला. पाखंडी लोकांचे पूर्ण खंडन करून सर्वत्र दिग्विजय केला. कोट्यावधी सांप्रदायी त्यांनी निर्माण केले. मोरेश्वर क्षेत्राचा जीर्णोद्धार त्यांनी केला. त्यांचा अधिकार एवढा मोठा होता की, प्रत्यक्ष त्यांची सेवा करता यावी, यासाठी स्वतः विष्णू, शिव, सूर्य, ब्रह्मदेव व गुणेश या पाच देवांनी मानव देह धारण करून त्यांचे शिष्यत्त्व पत्करले. मोरेश्वर क्षेत्रात राहून त्यांनी अखंड मोरयाची सेवा केली.
यांचा अवतार काळ – श्रावण शु. ५ शके १४९९ (इ. स. १५७७)
समाधी काळ – माघ वद्य १० शके १७२७ (इ. स. १८०५)